चाळीसगावात तोतया पोलिसांकडून सव्वा लाखांचे दागिने लंपास
चाळीसगाव (22 जुलै 2025) : शहरातील रामकृष्ण नगराजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने ठगवले व तब्बल 1.8 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही धक्कादायक घटना शनिवार, 20 जुलै रोजी सकाळी 9.15 वाजता घडली. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
रामकृष्ण नगरातील नवलेवाडी येथील वृद्ध महिला शोभा सीताराम देवरे (65) सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेल्या असता याच वेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व स्वतःला पोलीस असल्याचे सांगून तुमचे दागिने सुरक्षित नाहीत, तत्काळ काढून पेपरमध्ये गुंडाळा, असे सांगितले. यानंतर या महिलेने दागिने आरोपींच्या ताब्यात काढून दिले.





