जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकार्‍यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात


Two people including an Assistant Revenue Officer from Jalgaon Collectorate caught by ACB जळगाव (23 जुलै 2025) : नकला काढून देण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसुल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (49) व खाजगी नोकरदार संजय प्रभाकर दलाल (58, रा.शिव कॉलनी, जळगाव) यास जळगाव एसीबीने अटक केली. ही कारवाई बुधवार, 23 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
45 वर्षीय तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात 16 जुलै 2025 रोजी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत व सदस्य यांच्याविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाची कागदपत्रांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशांत ठाकूर व संजय दलाल यांना भेटले होते. त्यांनी नकला काढून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये मागितले व त्याबाबत 23 जुलै रोजी एसीबीकडे तक्रार देण्यात आली.






लाच मागणी पडताळणी केली असता यातील आरोपी संजय दलाल याने शासकीय फी व झेरॉक्सचे एक हजार 400 रुपये व सहाशे रुपये आमचे म्हणून दोन हजार रुपये मागितले व आरोपी प्रशांत ठाकूर यांनी लाचेला प्रोत्साहन दिले. तपासात 880 रुपये. शासकीय शुल्क व एक हजार 120 रुपये लाच रक्कम स्विकारल्याचे निष्पन्न झाले. आरोपींविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, एएसआय सुरेश पाटील, चालक बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी आदींनी हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !