मुक्ताईनगरात महामार्गाच्या कामानंतर शेतकरी संतप्त : शिंदे सेनेच्या आंदोलनानंतर आमदार ताब्यात
मुक्ताईनगर (23 जुलै 2025) : इंदूर हैद्राबाद महामार्ग मोबदला आंदोलन प्रकरणी मंगळवारी संघर्ष पेटला. पुर्णाड फाटा येथे मंगळवारी सकाळी महामार्गचे काम सुरू करण्यास हरकत घेत शेयकर्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर 30 शेतकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा निषेध म्हणून शिंदेसेनेने घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समवेत शिवसैनिकांना पोलिसांनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.
बाजारपेठ पटापट बंद
आमदार पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पडसाद मुक्ताईनगर शहरात उमटले असून दुपारी दीड वाजता मुक्ताईनगर बंद पुकारण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडकडीत बंद झाली.
आंदोलन रोखण्यासाठी राखीव दलाच्या चार तुकड्यांना येथे पाचरण करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी प्रथम आंदोलकांशी संवाद साधला नंतर आंदोलकांना ताब्यात घेतले. आमदार पाटील यांना ताब्यात घेताच वातावरण तापले होते आमदारांसोबत जवळपास 60 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.




