जळगाव जिल्हा परिषदेत लाचखोर हादरले : पाच हजारांची लाच घेताना महिला अधिकारी जाळ्यात
गणेश वाघ
Bribery in Jalgaon Zilla Parishad Shocked : Officer Caught by ACB while taking bribe of Rs. 5000 भुसावळ (24 जुलै 2025) : पगार बिलावर स्वाक्षर्या करण्यासह त्रृटी न काढण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनील भागवत (38, पिंप्राळा, जळगाव) यांना जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. अनेक दिवसांनंतर जळगाव जिल्हा परिषदेत झालेल्या यशस्वी सापळ्याने लाचखोर पुरते हादरले आहेत.





असे आहे लाच प्रकरण
46 वर्षीय तक्रारदार हे भौतीक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधीक्षक वर्ग 2 या पदावर शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र, जळगाव या कार्यालयात कार्यरत आहेत. 14 जुलै 2025 रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालयात गेल्यानंतर आरोपी माधुरी भागवत यांची भेट घेण्यात आली व तक्रारदाराचे जुन 2025 पगार बिलामध्ये काहीही त्रृटी न काढता पगार बिलाबर सह्या करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 12 हजारांची लाच मागण्यात आली व तक्रारदाराने 22 रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली.
आरोपी माधुरी भागवत यांनी 10 हजारांची लाच मागून पाच हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे व उर्वरीत पाच हजार रुपये इतर बिले निघाल्यावर द्या, अशी पंचासमक्ष लाच मागणी केली व गुरुवारी दुपारी पाच हजारांची लाच दालनातच स्वीकारताच पथकाने त्यांना अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेडेड पीएसआय सुरेश पाटील (चालक), हवालदार शैला धनगर. कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, कॉन्स्टेबल सचिन चाटे आदींनी हा सापळा यशस्वी केला.
