ब्रेकींग न्यूज : चाळीसगावात 60 कोटींचे अँफेटामाइन जप्त

39 किलोचा साठा : संभाजीनगरमार्गे बंगळुरूकडे जाणार्‍या गाडीवर कन्नड घाटात कारवाई


Amphetamine worth Rs 60 crore seized in Chalisgaon चाळीसगाव (25 जुलै 2025) : मडी ड्रग्जमध्ये उत्तेजक द्रव्य म्हणून वापरल्या जाणार्‍या अँफेटामाइर्नचा तब्बल 39 किलोचा साठा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड घाटातून एका वाहनातून जप्त केला आहे. या साठ्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा साठा दिल्ली नेल्यानंतर दिल्लीहून इंदूर, धुळे, संभाजीनगरमार्गे हा साठा बंगळुरूला पोहोचणार होता मात्र तत्पूर्वीच झालेल्या कारवाईने मोठे नुकसान टळले आहे.

काय घडले चाळीसगावात
गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील कन्नड घाटाजवळ महामार्ग पोलिस मदत केंद्रासमोर नाकाबंदीदरम्यान चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिल्लीहून बंगळुरूकडे जाणार्‍या ब्रेझा कार (डी.एल.बी.बी.7771) मधून जाणारा 39 किलो अँफेटामाईनचा साठा जप्त केला. जवळपास 40 ते 60 कोटींचा हा साठा असल्याची माहिती उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली. कारमधील सीटवर दोन ते तीन बॅगमध्ये हे अँफेटामाइन ठेवलेले होते. याप्रकरणी दिल्ली येथील सय्यद नामक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.






उत्तेजक म्हणून अँफेटामाइनचा वापर
अँफेटामाइनचा वापर एमडी ड्रग्जमध्ये केला जात असून त्याचे बाजार मूल्य प्रतिकिलो दीड ते दोन कोटी रुपये आहे. चालकाकडे या प्रकरणाची चौकशी केली जात असून त्याच्या माध्यमातून मालकाचे नाव पुढे येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !