पारोळ्यात घरफोडी : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Burglary in Parola : Accused in the net of Crime Branch जळगाव (25 जुलै 2025) स्थानिक गुन्हे शाखेने पारोळ्यातील घरफोडी प्रकरणी भूषण कैलास चंदनशीव (27, रा.अमळनेर) यास अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
काय घडले पारोळ्यात
गुरुवार, 24 जुलै रोजी पारोळा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी यांचा समावेश होता. तपास पथकाने तत्काळ घटनास्थळाचे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित भूषण कैलास चंदनशिव याची ओळख पटली.





आरोपीने दिली कबुली
गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
,यांनी आवळल्या मुसक्या
यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, आणि त्यांच्या पथकातील संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी यांनी केली.
