भुसावळात दोन घरे फोडली : नागरिक धास्तावले


Two houses demolished in Bhusawal : Citizens panicked भुसावळ (25 जुलै 2025)  : शहरातील स्वामी विहार कॉलनी व साईबाबा मंदिराजवळील भिरुड कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

बंद घरे पर्वणी
दोन्ही बंद घरे होती, एका घरात कोणीही राहात नसल्याने चोरट्यांना तेथे काहीही मिळाले नाही तर भिरूड कॉलनीत चोरी झाली, तेथे काय चोरले हे मात्र, घर मालक गावाला गेल्याने कळू शकले नाही.
स्वामी विहार कॉलनीतील दीपक तायडे यांचे घर सध्या बंद असून, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप कापले, मात्र, घरात कोणीही राहत नसल्याने व आत फक्त अवास्तव वस्तू असल्याने चोरटे काहीही चोरण्यात अपयशी ठरले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !