चारचाकी वाहन दुचाकीवर धडकले : चौघे जखमी


Four-wheeler hits two-wheeler : Four injured यावल (26 जुलै 2025) : यावल तालुक्यातील डांभूर्णी या गावाकडून जळगाव जात असताना एका दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य व त्यांच्या मुली गंभीर जखमी झाल्या. या चौघांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातानंतर वाहन चालक हा पसार झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वाहन वरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
डांभूर्णी गावाकडून जळगावकडे जाणार्‍या रस्त्यावर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या समोरून यावल शहरातील संभाजी पेठेतील रहिवासी होमगार्ड संदीप भगवान कोळी, त्याची पत्नी रेखा कोळी आणि त्याच्या दोन्ही लहान मुली लक्ष्मी व तन्वी हे दुचाकी (क्रमांक एम. एच.19 बी. एन. 6710) द्वारे जात होते. त्यांच्या दुचाकीला मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एम. एच. 19 ए.पी. 5341) वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये चौघे गंभीर जखमी झाले.

हा अपघात 06 एप्रिल 2025 रोजी दुपारी अडीच वाजता घडला होता. अपघातानंतर चौघांना प्रारंभी जळगाव व नंतर मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या अपघातानंतर कार चालक तेथून पसार झाला होता.. या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !