शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : पाठलागाअंती परप्रांतीयाकडील सव्वा लाखांचा अफू जप्त

संशयीतांचे चोपडा ग्रामीण हद्दीतून पलायन : वाहनाला घडला अपघात


Major action by Shirpur Taluka Police : Opium worth Rs. 1.25 lakh seized from migrant after chase शिरपूर (26 जुलै 2025) : जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण हद्दीत सत्रासेनजवळ नाकाबंदी चुकवून दोन वाहने भोईटी मार्गाने पसार होत असल्याची माहिती प्राप्त होताच शिरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करीत दोन्ही वाहनातील दोन संशयीतांना अटक केली तर एक संशयीत पसार झाला. अपघातग्रस्त वाहनातून सव्वा लाखांची अफूची कोरडी बोंडे जप्त करण्यात आली. पांचा सोनाराम (उदासर, अलपूरा, जि.बाडमेर, राजस्थान) व सुरेशकुमार गोपीचंद (रणोदर, ता.शीतलवाना, जि.जालोर, राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर आरोपी पसार होत असताना त्यांचा साथीदार दिनेश कुमार (बाबूलाल मंडी की भेरी, भुनिया बाडनेर, राजस्थान) हा पसार झाल्याचे सांगण्यात आले.

सव्वा लाखांचा अफू जप्त
संशयीत सत्रासेन येथील नाकाबंदी चुकवून वाहन (जी.जे.06 एल.एस.0075) व (एम.एच.12 एल.डी.8141) द्वारे पसार झाले मात्र शिरपूर तालुका पोलिसांना मेसेज मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली असता आरोपींचे एक वाहन भोईटी गावाजवळ उलटले व त्याची तपासणी केली असता त्यात एक लाख 26 हजार रुपये किंमतीची अफूची बोंडे व नऊ लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली.




यांनी केली कारवाई
यांनी ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संतोष पाटील, हवालदार जगन्नाथ कोळी, हवालदार राजू ढिसले, कॉन्स्टेबल विजय ढिवरे, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल दिनकर पवार, चालक हवालदार अल्ताफ बेग, उस्मानबेग मिर्झा, कॉन्स्टेबल इसरारी फारूकी, चोपडा ग्रामीणचे शिवाजी बाविस्कर, कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील आदींच्या पथकाने केली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !