वांजोळ्यातील विवाहितेचा शॉक लागल्याने मृत्यू
Married woman from Vanjola dies of shock भुसावळ (27 जुलै 2025) : पाण्याची मोटार लावताना विद्युत शॉक लागल्याने विवाहितेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. दीपाली चेतन तायडे (27) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत विवाहितेच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर आक्षेप नोंदविला आहे.
काय घडले वांजोळ्यात
दीपाली चेतन तायडे या पाण्याची मोटर लावत असताना त्यांना विजेचा जबर धक्का बसला व त्यानंतर त्यांना भुसावळातील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी दीपाली यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर मृतदेह ट्रॉमा केअर सेंटर येथे शवविच्छेदना साठी दाखल करण्यात आला. यावेळी सासरच्या मंडळींवर दीपालीच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे आक्षेप नोंदवले. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपालीच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.


