जळगाव हादरले : चाकूचे वार करीत तरुणाची हत्या

न्यू जोशी कॉलनी परिसरात घडली घटना : संशयीतही जखमी


Jalgaon shaken: Youth murdered with knife जळगाव (27 जुलै 2025)  : शहरातील गुन्हेगारी पुन्हा उफाळून आली असून शहरातील सम्राट कॉलनीतील तरुणाची जुन्या वादातून चाकूने वार करीत हत्या करण्यात आली ही घटना रविवार, 27 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. धीरज दत्ता हिरवाडे (24, रा.सम्राट कॉलनी, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वादातून झाली हत्या
धीरजचे गेल्या काही दिवसांपासून त्याचे काही तरुणांसोबत वाद होते. या वादातून रविवार, 27 जुलै रोजी दुपारी तीन वाजता न्यू जोशी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ धीरजचे मारेकरी तरुणासह वाद झाले. या वादात धीरजला छातीवर, चेहर्‍यावर, डाव्या हातावर गंभीर वार झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.






वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

धीरज हिरवाडे याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केलादरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांसह एलसीबीच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमध्ये कल्पेश भटू चौधरी (वय 23, रा.सम्राट कॉलनी) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, मृताच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !