जळगावातील रामानंद हद्दीत पाच घरफोड्या : कुख्यात जुनेदला एलसीबीकडून बेड्या


Five house burglaries in Ramanand area of Jalgaon: Notorious Junaid shackled by LCB जळगाव (28 जुलै 2025) : जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या करणार्‍या मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह (24, रा.मशीदजवळ, शिरसोली प्र.न., जळगाव) यास गुन्हे शाखेने अटक केली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गेल्या चार महिन्यांपासून आरोपी शाह हा पसा होता व मात्र सिंधी कॉलनी परिसरात तो येताच त्यास रविवारी अटक करण्यात आली. यापूर्वी, स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर शिवराम डोईफोडे (28, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला 14 फेब्रुवारी 2025 रोजी अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता.






सागर डोईफोडेने अटकेदरम्यान मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह, रवी प्रकाश चव्हाण आणि नितीन चव्हाण (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांच्यासोबत मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून पोलिस मुस्तकीमच्या शोधात होते, मात्र पोलिसांना चाहूल लागल्याने तो सुरतला पसार झाला होता.

रविवार, 27 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अकरम शेख आणि पोलिस शिपाई रवींद्र कापडणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुस्तकीम उर्फ जुनेद शाह जळगावात येणार आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी सिंधी कॉलनी परिसरात सापळा रचून मुस्तकीमला ताब्यात घेतले.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगावचपोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रवींद्र कापडणे आणि चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !