साकळीजवळ दुचाकीला भीषण अपघात : प्रौढ जागीच ठार
Fatal two-wheeler accident near Sakli : Adult dies on the spot यावल (28 जुलै 2025) : यावल तालुक्यातील साकळी गावाजवळ अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडून यावलकडे येत असलेल्या दुचाकीला यावलकडून चोपडा शहराकडे जात असलेल्या दुचाकीने जबर धडक दिली. यामध्ये एक 45 वर्षीय इसम हा ठार झाला तर समोरील दुचाकीस्वार हा जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असा घडला अपघात
चोपड्याकडून यावलकडे दुचाकी (एम.एच. 19 ई. बी. 5442) द्वारे राजेंद्र रमेश सपकाळे-कोळी (45, रा.वढोदे) हे येत होते. साकळी गावाजवळ रामजी जिनिंगच्या पुढील वळणावर यावलकडून चोपड्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या दुचाकी (क्रमांक एम. एच.19 इ. एल. 7753) वरील चालक विकास प्रकाश पवार (रा. साळशिंगी, ता.बोदवडत्र याने जवळ धडक दिली. या अपघातामध्ये रमेश सपकाळे कोळी हे ठार झाले.
अपघात प्रकरणी संदीप सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दुचाकी चालक विकास पवारविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.


