निंभोर्यानजीक अनोळखी 35 वर्षीय महिलेचा खून
Murder of an unidentified 35-year-old woman near Nimbhora निंभोरा (29 जुलै 2025) : निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरासीम ते नांदुपिंडी तापी पुलाशेजारी 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला होता. या महिलेचे हात-पाय बांधलेले होते. एका सिमेंट खांबाच्या तुकड्यास बांधून महिलेला नदीत फेकून देण्यात आले होते. पोलिसांकडून खुनाचा दाखल झाल्यानंतर आता ओळख पटवण्यावर भर देण्यात आला आहे.
मृताची ओळख पटेना
24 जुलै रोजी खुनाचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीस कर्मचारी सुरेश पवार यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला. मृताची ओळख पटवण्यासाठी परिसरातील हटिल, लॉजेस तसेच खबर्यांच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे.
स्केचवरून एआयच्या माध्यमात महिलेचे प्रतिरुप छायाचित्र तयार करण्यात आले असून अद्यापही ओळख पटलेली. आजूबाजूच्या पोलिस ठाण्यातून बेपत्ता महिलांच्या नोंदीची पडताळणी आहे. महिलेबाबत कोणाला असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी केले आहे.


