किनगाव-मालोद रस्त्यावर छोटहत्ती वाहनातील बॅटरी व स्टेपनी लांबवली


यावल (29 जुलै 2025) : यावल तालुक्यातील किनगाव गावात मालोद रस्त्यावर लावलेल्या एका छोटा हत्ती वाहनातून बॅटरी आणि स्टेपनी टायर लांबवण्यात आले. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

किनगाव गावात मालोद जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर शेख रफिक शेख सुपडू या तरुणाने त्याचे छोटा हत्ती वाहन लावले होते. या वाहनातील अडीच हजार रुपये किंमतीची बॅटरी आणि दोन हजार रुपये किंमतीचे स्टेपनी टायर अज्ञात चोरट्याने चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार नोंदवण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !