अंजाळेजवळ दुचाकीला अज्ञात डंपरची धडक : भुसावळातील दुचाकीस्वार ठार


An unknown dumper hits a bike near Anjale : A bike rider from Bhusawal was killed यावल (3 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील अंजाळेजवळ भुसावळ कडून यावल येत असलेल्या दुचाकीस अज्ञात डंपरने धडक दिली. यात दुचाकीस्वार 45 वर्षीय इसम ठार झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला. जखमींना नागरिकांच्या मदतीने भुसावळ येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मयत व जखमी हे सर्व भुसावळातील रहिवासी आहे.

असा घडला अपघात
अंजाळे गावाजवळ रविवारी दुपारी भुसावळकडून यावलकडे मोटरसायकल (क्रमांक एम. एच.19 ई.एम. 6731) व्दारे इरफान मुस्ताक बागवान (45), दानिश मोेहंमद बागवान (25) व सईद शकील बागवान (49) हे येत असताना लहान पाटचारीजवळ या दुचाकीला भरधाव वेगातील अज्ञात डंपर चालकाने धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच अंजाळे येथील आनंद सपकाळे, तुषार पाटील, विक्की कोळी, अजय भोई यांनी घटनास्थळी धाव घेतली व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणे अंमलदार निलेश चौधरी यांनी तत्काळ हवालदार एजाज गवळी, अमित तडवी यांनी घटनास्थळी रवाना केले तर जखमींना उपचारार्थ भुसावळ रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, उपचार सुरू असतांना इरफान बागवान यांचा मृत्यू झाला तर इतर दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातग्रस्त दुचाकी पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. अज्ञात डंपरचा तपास पोलिस करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !