पुरस्कारासाठी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कार्याचा गौरव करणार्‍या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा उपक्रम पथदर्शी : भुसावळात सौ.रजनीताई सावकारे


भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : जळगाव जिल्ह्यात पुरस्कार देताना काही ठिकाणी पुरस्कारार्थीकडून मोबदल्याची अपेक्षा ठेवली जाते मात्र भुसावळातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या डिजिटल मंचने रुपयाची अपेक्षा न ठेवता नवरत्नांचा तसेच भुसावळ भूषण चौघांचा केलेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद व पथदर्शी उपक्रम असल्याचा आशावाद भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रजनीताई संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील स्टार लॉनमध्ये ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीद घेवून कार्यरत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या खान्देशातील वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ‘महिला सबलीकरणावर’ तब्बल एका तपापासून कार्य करणार्‍या रजनी सावकारे यांचा सन्मान करण्यात आला असता त्यांनी मनोगत व्यक्त केले.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलने उमटवला वेगळा ठसा
रजनी सावकारे म्हणाले की, आयोजकांनी अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवल्याने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महिलांचे पारंपरीक पद्धत्तीने फेटा बांधून व औक्षण करून स्वागत करण्यात आले व मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. येथेदेखील सुरूवातीला स्त्री शक्तीाला प्राधान्य देण्यात आले. जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता वास करतात, असे सांगून त्या म्हणाल्या की, पुरस्कार मिळाल्याने आणखी जवाबदारी वाढली आहे. आगामी काळातही महिला सबलीकरणासाठी कार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.






जिल्ह्यात काही ठिकाणी पुरस्कार देताना आयोजकांकडून रकमेची वा जाहिरातीची अपेक्षा केली जाते मात्र त्यास अपवाद ‘बे्रकिंग महाराष्ट्र’ ठरल्याचे त्यांनी सांगत आयोजकांचे कौतूक केले.

पुरस्काराने वाढली जवाबदारी : डॉ.साहू
पुरस्कार्थी डॉ.सांतनू कुमार साहू म्हणाले की, आज मिळालेला पुरस्कार खरे तर दोन वर्षांच्या परिश्रमाचे यश आहे, पुरस्काराने आता अधिक जवाबदारी वाढली आहे. रुग्ण सेवेसाठी आम्ही नेहमीच सज्ज असल्याचे डॉ.साहू यांनी सांगितले.

असे होते पुरस्काराचे स्वरूप
कार्यक्रमासाठी उपस्थित पुरस्कारार्थींनी सन्मानचिन्ह, बुके, गिप्ट तसेच ‘बहिणाईंची कहाणी व गाणी’ हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. वाचनाची गोडी लागण्यासाठी व वाचन संस्कृती जपली जावी हा या मागील उद्देश होता.

या ‘नवरत्नांचा’ सन्मान
याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत नवरत्नांचा मान्यवरांनी सन्मान केला. त्यात महिला सबलीकरण- रजनी सावकारे, नाट्य (सांस्कृतिक), शैक्षणिक- प्राचार्य अनघा पाटील, महिला समुपदेशन- भारती रंधे-म्हस्के, प्रेरणा देशमुख, आरोग्य- प्रवीण फालक, सामाजिक- सोनू मांडे, वैद्यकीय- डॉ.सांतनूकुमार साहू, भाषा अभ्यासक- प्र.ह.दलाल, सांस्कृतिक- गणेश फेगडे यांना गौरवण्यात आले.

‘चौघांना भुसावळ भूषण पुरस्कार’
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याहस्ते गौरवण्यात आलेल्या व एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या नूर फातेमा मण्यारसह बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींगमध्ये गोल्ड मेडल पटकावणार्या तीर्थराज मंगेश पाटील (भुसावळ), बालभारती अभ्यास मंडळावर निवड झालेल्या तसेच राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार पटकावणार्या डॉ.जगदीश पाटील, आरोग्य दूत म्हणून काम करणायर्या भुसावळातील मयूर अंजाळेकर यांचा ‘भुसावळ भूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. प्रास्ताविक ब्रेकिंगचे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी तर सूत्रसंचालन प्रा.जतीन मेढे यांनी केले. यशस्वीतेसाठी अमोल देवरे, दीपक सोनार, गणेश सोनार, मयूर जाधव व ब्रेकिंगच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.

‘वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन’
मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्याह स्ते ‘विकासाच्या वाटा’ या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 70 जीएसएम मॅफली कागदावर प्रिंट केलेली सुबक पुरवणी पाहून मंत्री संजय सावकारे यांनी विशेष कौतुक केले.

ब्रेकिंगवर शुभेच्छांचा वर्षाव
सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष राहून, फोनवरून तसेच सोशल मिडीयातून शुभेच्छांचा वर्षाव करीत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ पोर्टलवरील आपले प्रेम अधिक वृद्धिंगत केले.

 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !