भुसावळातील प्रथितयश डॉ.सांतनू कुमार साहू यांचा ‘नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कारा’ने सन्मान
Renowned Dr. Santanu Kumar Sahu from Bhusawal honored with ‘Navratna Samarpan Seva Gaurav Puraskar’ भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील डॉ.सांतनू कुमार साहू यांना उत्तर महाराष्ट्रातील ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीद घेवून कार्यरत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलतर्फे ‘नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले. ‘बे्रकिंग महाराष्ट्र’च्या सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कार्यरत नवरत्नांचा सन्मान यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व आमदार अमोल जावळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉनमध्ये सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलचे सर्वेसर्वा डॉ.सांतनू कुमार साहू यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.





पुरस्काराने वाढली जवाबदारी : डॉ.साहू
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगतात पुरस्कार्थी डॉ.सांतनू कुमार साहू म्हणाले की, आज मिळालेला पुरस्कार खरे तर दोन वर्षांच्या परिश्रमाचे यश आहे. पुरस्काराने आता अधिक जवाबदारी वाढली आहे. रुग्ण सेवेसाठी आम्ही नेहमीच सज्ज असल्याचे डॉ.साहू यांनी सांगितले.
असे होते पुरस्काराचे स्वरूप
कार्यक्रमासाठी उपस्थित पुरस्कारार्थींनी सन्मानचिन्ह, बुके, गिप्ट तसेच ‘बहिणाईंची कहाणी व गाणी’ हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. वाचनाची गोडी लागण्यासाठी व वाचन संस्कृती जपली जावी हा या मागील उद्देश होता.
