भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये राखी बनवण्यावर कार्यशाळा


Workshop on Rakhi making at The World School, Bhusawal भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये ‘इनर व्हिला क्लब’ भुसावळतर्फे राखी बनवण्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

प्रमुख पाहुणे सीमा सोनार, योगीता वायकोळे, अदिती भडंग, सुनीता पाचपांडे, रेवती मांडे, हेमलता सोनार यांचे स्वागत क्रियाकलाप प्रमुख यामिनी वारूळकर यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन केले.






पाचवी-आठवीच्या विद्यार्थिनींनी विविध राख्या सादर केल्या. सांस्कृतिक प्रमुख ज्योती राठोड यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. शिक्षक, पर्यवेक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !