डांभूर्णीत अंगणात शेण पडल्याच्या कारणावरून पिता-पुत्राला आठ जणांची मारहाण
Father and son beaten up by eight people for dropping dung in their yard in Dambhurni यावल (6 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील पंडित नगरात अंगणात गुरांचे शेण पडल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून पिता-पुत्रांना आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. एकावर डोक्यात चाकूने वार करून दुखापत करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले डांभूर्णीत
डांभूर्णीतील पंडित नगरात अंगणात गुरांचे शेण पडल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून बाळू अशोक धनगर (40) व त्यांचे वडील अशोक रामचंद्र धनगर या पिता पुत्रांना संतोष पुंडलिक कोळी, उमाकांत पुंडलिक कोळी, रोहित उमाकांत कोळी, पवन उमाकांत कोळी, अरुणा संतोष कोळी, मनीषा उमाकांत कोळी, तेजस संतोष कोळी व अविनाश डिगंबर कोळी या आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली व अशोक धनगर यांच्या डोक्यावर पवन कोळी येणे चाकूने वार करून दुखापत केली.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बाळू धनगर यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


