रेल्वे प्रवासात महिलेचे दागिने लांबवले : भुसावळातील चोरट्यांना अटक
Woman’s jewellery stolen during train journey: Thieves arrested in Bhusawal जळगाव (6 ऑगस्ट 2025) : रेल्वे प्रवासात महिलेची दागिण्यांची पर्स लांबवण्यात आली मात्र सीसीटीव्ही आधारे यंत्रणेने भुसावळातील आरोपींना बेड्या ठोकल्या. दोन लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काय घडले जळगावात
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नर्स ज्योती प्रकाश भोसले (39) या 5 ऑगस्ट रोजी जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून मनमाडला जाण्यासाठी गोवा एक्सप्रेसमध्ये चढत असताना त्यांची हॅण्डबॅग गहाळ झाली. या पर्समध्ये सुमारे दोन लाख 41 हजार रुपये किमतीचे दागिने होते. त्यांना नाशिक येथे जाण्याची घाई असल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
त्यानंतर भोसले यांनी रेल्वे पोलिसांना तक्रार दिल्यावर, रेल्वे पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या तपासणीतून दोन संशयितांना ओळखण्यात आले. पोलिसांनी भुसावळ येथून आदित्य ध्यानेश्वर कुमावत (18, रा. भुसावळ) व अशलम हाफिज शाह (19, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली व आरोपीे चोरीचे सोने भुसावळमध्ये विकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई आरपीएफचे प्रभारी निरीक्षक अमित कुमार यादव, भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर आरपीएफचे कॉन्स्टेबल विनोद जेठवे, मनोज मौर्य, पंकज वाघ, एन.एम. महाजन तसेच भुसावळच्या जीआरपी पथकातील पोलीस कर्मचार्यांनी संयुक्तपणे केली.


