मित्र उपक्रमांतर्गत सल्लागार समिती जिल्हा दौर्यावर : आमदार अमोल जावळे यांच्याशी सकारात्मक चर्चा
Advisory Committee on District Tour under Mitra Initiative : Positive Discussion with MLA Amol Javale रावेर (7 ऑगस्ट 2025) : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रासाठी एक ट्रिलियन डॉलर्स व जळगाव जिल्ह्यासाठी 25 बिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मित्र उपक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार समितीने नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला.
या दौर्याचा उद्देश जिल्ह्याच्या आर्थिक वृद्धीला गती देणार्या क्षेत्रांचा अभ्यास करून उत्पादन, प्रक्रिया, निर्यात व बाजारपेठेशी जोडणार्या योजनांचा आराखडा तयार करणे, तसेच दरडोई उत्पन्नात वाढ साधणे हा होता.





या दौर्यात सल्लागार प्रीतम मोहनसिंग व विवेक पाटील यांनी रावेरचे आमदार आमदार अमोल जावळे यांची सदिच्छा भेट घेऊन रावेर मतदारसंघातील संभाव्य आर्थिक स्रोतवाढीच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. विशेषतः, मतदारसंघातील भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून, स्थानिक उत्पादनक्षमता, प्रक्रिया उद्योग, निर्यात संधी व मार्केट लिंक साखळीतील अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीदरम्यान जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, प्रांताधिकारी बबन काकडे, उपमुख्य लेखापाल हर्षल दांडेकर, ऊझझचण युनिट कोऑर्डिनेटर अमोल जुमाडे, सावदा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे हे मान्यवर उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि चखढठ- च्या मार्गदर्शनातून स्थानिक पातळीवरील आर्थिक संधींना चालना देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा विकास अधिक गतिमान होईल.
शासन, सल्लागार संस्था व स्थानिक भागधारक यांच्यातील समन्वयातून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
