नितीन गणापूरे जळगावचे तर अनिल बडगुजर फैजपूर विभागाचे नूतन पोलीस उपअधीक्षक

गणेश वाघ
Nitin Ganapure is the new Deputy Superintendent of Police of Jalgaon and Anil Badgujar is the new Deputy Superintendent of Police of Faizpur division. भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : राज्यातील तब्बल 156 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. या आदेशाकडे राज्यभरातील पोलीस निरीक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, दुसरीकडे 35 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या तर पाच अधिकार्यांच्या पदस्थापनाही करण्यात आल्या आहेत.
आज-उद्या अधिकारी स्वीकारणार पदभार
जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची भुसावळ विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाल्यानंतर रिक्त पदावर मालेगावचे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे यांची वर्णी लागली आहे तर नाशिक एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांची फैजपूर विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे.
खान्देशात या अधिकार्यांची पदोन्नतीवर बदली
पोलीस निरीक्षक सुभाष दादा भोये यांची अक्कलकुवा पोलीस उपअधीक्षकपदी तर नाशिक ग्रामीण डीएसबी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव धुळे मुख्यालय पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
