युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.कल्याणी नागूलकर

सचिवपदी प्रा.क्षमा सराफ यांची निवड


Dr. Kalyani Nagulkar appointed as the chairperson of the Dahi Handi Festival Committee for young women जळगाव (9 ऑगस्ट 2025) : भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) जळगाव येथे युवतींची दहिहंडी आयोजित करण्यात आली आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा 17 वे वर्ष आहे. दहिहंडीसारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहिहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.

दहिहंडी उत्सवाची समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिवपदी प्रा.क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.





उर्वरित कार्यकारीणी अशी
अध्यक्ष डॉ.कल्याणी नागूलकर, उपाध्यक्ष डॉ.अनिता पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, डॉ.कल्याणी मोहरील, सचिव प्रा. क्षमा सराफ, स्वागत समिती प्रमुख डॉ. सोनाली महाजन, लिना पवार, खजिनदार निलम जोशी, सहसचिव हर्षाली चौधरी, संध्या कांकरीया, प्रसिद्धी प्रमुख यामिनी कुळकर्णी, सदस्या चेतना नन्नवरे, प्रा. श्रीया कोगटा, क्रिस्टाबेल परेरा यांची निवड करण्यात आली.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !