यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाचा वापर करा : भुसावळात प्राचार्य डॉ.शरद अग्रवाल

भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थिनींनी जास्तीत-जास्त ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे असे आवहान प्राचार्य शरद अग्रवाल यांनी येथे केले. शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.शरद अग्रवाल बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन
मान्यवरांच्या हस्ते डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.के.सी.सूर्यवंशी यांनी केले. प्राचार्य डॉ.शरद अग्रवाल यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला.