जळगावच्या रामानंद हद्दीतील जुगाराचा डाव एलसीबीने उधळला : नऊ जुगारी कारवाईच्या कचाट्यात

LCB foils gambling plot in Ramanand area of Jalgaon : Nine gamblers in the grip of action जळगाव (9 ऑगस्ट 2025) : जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीत हरीविठ्ठल नगर भागात पत्त्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती जळगावचे एलसीबीचे डॅशिंग पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळताच त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश पथकाला दिले. पथकाने नऊ जुगार्यांचा डाव उधळत त्यांच्याकडील तीन लाख 14 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागुल, हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे आदींच्या पथकाने केली.