सामाजिक ऐक्याचे रक्षाबंधन : भुसावळातील साबीर शेख 30 वर्षांपासून जपताय जातीय सलोखा
गणेश वाघ
Raksha Bandhan of social unity : Sabir Sheikh from Bhusawal has been maintaining communal harmony for 30 years भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : प्रत्येक बहिण-भावाच्या मनातील हळवा कोपरा म्हणजे रक्षा बंधनाचा सण. देशभरात हा सण शनिवार, 9 रोजी मोठ्या धूम-धडाक्यात साजरा झाला तसा भुसावळ शहरात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कास्मॉपॉलिटीन भुसावळात रक्षाबंधन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रक्षाबंधन सोहळ्यात हिंदू बहिणीने मुस्लीम भावाला राखी बांधून जातीय सलोखा जपला.
30 वर्षांपासून साबीर शेख जपताय जातीय सलोखा
उर्दू कवी अलामा इक्बाल म्हणतात
‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना’





या त्यांच्या ओवीशी अनुरूप कार्य भुसावळातील माजी नगरसेवक साबीर शेख गेल्या 30 वर्षांपासून निभावताय.
30 वर्षांपासून जपले ऐक्य
भुसावळ शहरातील पंधरा बंगला भागातील रहिवासी सुमन वराडे (मूळ रा.नाशिक) या सुमारे 30 वर्षांपासून माजी नगरसेवक व हिंदू-मुस्लीम एकता मंच अध्यक्ष साबीर शेख यांना राखी बांधताय. वराड यांच्या भावाचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. यावेळी साबीर शेख यांनी त्यांना धीर देत भाऊ गेला असलातरी दुसरा भाऊ पाठीराखा असल्याचे म्हणत रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यास सुरूवात केली. गेल्या 30 वर्षांपासून साबीर शेख हे राखी बांधत आले आहेत. भुसावळातील ऐक्याच्या रक्षाबंधनाचे सर्व समाजातून कौतुक होत आहे.
हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी केली प्रार्थना
जिस किसी हिंदू बहन का भाई नहीं है तो हाजीर है मेरी कलाई, असा संदेशही यानिमित्ताने माजी नगरसेवक साबीर शेख यांनी या माध्यमातून दिला आहे. देशात ऐक्य नांदावे, शांतता रहावी, मुस्लीम एकोपा टिकून रहावा, अशी प्रार्थनाही त्यांनी यानिमित्ताने या दिवशी केली.
