यावल शहरात माजी आमदारांसह पुत्रास दारूच्या नशेत शिविगाळ


Former MLA and his son were abused while drunk in Yaval city यावल (10 ऑगस्ट 2025)  : यावल शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ओम झेरॉक्स या दुकानाच्या जवळ एकाने शनिवारी काही एक कारण नसतांना माजी आमदार व त्यांचे पुत्र यांचे नाव घेऊन सार्वजनिकरित्या शिवीगाळ केली व ते जर शहरात आले व पटेल वाड्यात पाय ठेवला तर त्यांचे पाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे रात्री पोलिस ठाण्यात कॉग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी झाली.

काय घडले यावल शहरात
यावल शहरातील पोलीस ठाण्यासमोर ओम झेरॉक्सचे दुकान आहे. या दुकानाच्या जवळ शनिवारी सायंकाळी अनिस उर्फ पप्पू छोटू पटेल (विरार नगर) हा उभा होता. त्याने काही एक कारण नसतांना दारूच्या नशेत माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व त्यांचा मुलगा धनंजय चौधरी यांचे नाव घेऊन त्यांना शिविगाळ केली तसेच जर माजी आमदार व त्याचा मुलगा यावल शहरातील पटेल वाड्यात आला तर त्याचे पाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. सदर प्रकार हा काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शनिवारी रात्री मोठ्या संख्येत काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात एकत्र झाला होता.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अनिल जंजाळे यांच्या फिर्यादीवरून अनिस उर्फ पप्पू पटेल यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !