भुसावळातील प्राथमिक शिक्षक पतपेढीतील अपहार प्रकरण : 16 संचालकांची जामिनावर सुटका
चौकशीला बोलावल्यानंतर केली अटक : अटक प्रक्रियेत तांत्रिक बाबी पूर्ण नसल्याचा युक्तीवाद
Primary Teachers’ Credit Union embezzlement case in Bhusawal : 16 directors released on bail भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : नूतन सहकारी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीतील 9 कोटी 90 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने 16 कर्मचारी व संचालकांना अटक केली होती. या प्रकरणात प्रथमवर्ग न्या. एम.आर.बागडे यांनी ही अटक बेकायदेशिर ठरवली आहे. यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या 16 जणांच्या जामीन झाला आहे. उर्वरित पसार आरोपींनीही आता अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले आहेत.
काय घडले भुसावळच्या पतपेढीत
प्राथमिक शिक्षकांच्या नुतन सहकारी पतपेढीत 9 कोटी 90 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 28 जुलैला 16 संचालक व कर्मचार्यांना अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयाने 29 जुलैला न्यायालयाने संचालक व कर्मचार्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले मात्र पोलिस व सरकारी पक्षाने या प्रकरणी मुदत मागून क्रिमिनल रिव्हीजन प्रथम वर्ग न्यायालयाकडे मांडून पोलिस कोठडीची मागणी केली. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने या संचालकांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ठरवून त्यांचा जामिन मंजूर केला आहे. यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या संचालक व कर्मचार्यांची सुटका झाली आहे.
29 संशयीतांचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
याच गुन्ह्यातील पसार आरोपी 29 जणांनी आता अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हे 29 आरोपी अद्यापही चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. न्यायालयात 16 जणांतर्फे अॅड.मनिष सेवलानी, अॅड.तुषार पाटील, अॅड.उमेश पाटील, अॅड.कल्याण पाटील यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणी आता पसार असलेल्या 29 जणांवर काय कारवाई होणार? याकडेही लक्ष लागून आहे.
अटक प्रक्रियेत त्रृटी
बचाव पक्षाने न्यायालयासमोर अटकेपूर्वी आवश्यक तांत्रिक बाबींचा विचार करण्यात आला नसल्याचा युक्तीवाद केला. यावर न्यायालयाने तपास यंत्रणेला त्रुटींबाबत विचारणा केली. चौकशीसाठी बोलवल्यानंतर थेट अटक केल्याचा युक्तीवाद केल्याचा बचाव पक्षाचा युक्तीवाद कोर्टात महत्वाचा ठरून आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी रद्द करण्यात आली.