चाळीसगाव बसस्थानकात अनोखे रक्षाबंधन


चाळीसगाव (10 जुलै 2025) : आमदार मंगेश चव्हाण हे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चाळीसगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या नवीन बीएस सहा बसेसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी बसस्थानकात आल्यानंतर यावेळी मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनाला जाणार्‍या माता-भगिनींची गर्दी होती. यावेळी गर्दीतून एका महिलेने आमदार मंगेश चव्हाण यांना पाहताच ती आमदारांकडे आली व म्हणाली की, दादा माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला ओवाळावे मात्र कधी जमलं नाही. आज योगायोगाने मी रक्षाबंधन ला माहेरी जात असताना तुम्ही मला इथे भेटले. मला खूप आनंद झाला, या बहिणीच्या हातून राखी आपण हातात घालावी, अशी विनंती त्या ताईने केली.

बहिणीचं प्रेम बघून आमदार चव्हाण देखील भारावले व त्यांनी आनंदाने बहिणीच्या हातून राखी बांधत बसस्थानक येथेच रक्षाबंधन साजरे केले. हा क्षण तिथे आजूबाजूला उपस्थित असलेले पदाधिकारी एसटी महामंडळ कर्मचारी व प्रवासी मोठ्या कुतूहलाने बघत होते. एक लोकप्रतिनिधी काम करत असताना कशा पद्धतीने नात्यांची गुंफण विणत असतो हे सर्व उपस्थित मनात साठवत होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !