जळगावातील रामानंद पोलिसांची कारवाई : घरात देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्या दाम्पत्यावर कारवाई

Action taken by Ramanand Police in Jalgaon : Action taken against couple running prostitution business in their home जळगाव (10 ऑगस्ट 2025) : जळगावातील रामानंद पोलिसांनी घरातच देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्या दाम्पत्याला अटक केली तर पश्चिम बंगालच्या 23 वर्षीय तरुणीची सुटका केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना घरात सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून करवाई केली. जळगाव्या न्यू स्टेट बँक कॉलनीतील दोन मजली घरात संशयीत दिनेश संजय चौधरी (35, रा.दुध फेडरेशन रोड, जळगाव) व त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ भारती दिनेश चौधरी (42, रा.देवेंद्र नगर,हल्ली मु. न्यू स्टेट बँक कॉलनी, जळगाव) हे दोन्ही हॉलमध्ये होते तर वरच्या मजल्यावर बंद खोलीची तपासणी केली असता तेथे तरुणी व डमी ग्राहक आढळून आले.

रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. तेथे संशयित आरोपी दिनेश चौधरी व त्याची पत्नी यमुना प्रजापती उर्फ भारती चौधरी यांच्यावर कुंटणखाना चालवीत असल्या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना घूनावत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन रणशेवरे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी आदींनी कारवाई केली.
