मुंबईहुन संतापात सोडले घर : सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने अल्पवयीनाला घेतले ताब्यात


Mumbai : Vigilant Railway Security Force takes minor into custody after leaving home in anger भुसावळ (11 ऑगस्ट 2025) : पनवेल (मुंबई) येथून एलटीटी गोरखपूर या एक्स्प्रेस गाडीने संतापात घर सोडून सतना येथे जात असलेल्या 16 वर्षाच्या मुलीस रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गाडीतून ताब्यात घेत जळगावात बाल कल्याण समितीकडे सोपविले,

काय घडले रेल्वे प्रवासात
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ऑपरेशन नन्हें फरिश्ते’अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने तत्परता दाखवत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. ही घटना 7 ऑगस्ट रोजी घडली.

आरपीएफला मिळालेल्या माहितीवरून 7 ऑगस्ट रोजी एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस (क्र. 11081 डाउन) या गाडीच्या ए -वन कोचमध्ये तिकीट तपासणीस ए.डी.सरदार यांनी एक अल्पवयीन मुलगी प्रवास करताना आढळली. चौकशीत समजले की, ती घरच्यांवर संतापून, नाराज होऊन पवई (मुंबई) येथून सतना जाण्यासाठी निघाली होती. यावेळी सरदार यांनी आरपीएफ यांना माहिती देत भुसावळला त्यांनी त्या मुलीला ताब्यात दिले. आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली सुरक्षित ठेवले.

एएसआय पी.के.दीक्षित यांनी एनजीओ प्रतिनिधी दीपाली निवाडे यांच्या उपस्थितीत मुलीची चौकशी केली असता, तिने आपले नाव शिल्पा (वय 16, रा. पवई, हीरानंदानी, मुंबई) असे सांगितले. आरपीएफने कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून मुलीला एनजीओमार्फत जळगाव येथील बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुलीच्या परिवारास याची माहिती देण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !