धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई : दहा लाखांचा गांजा जप्त
Major action by Dharangaon police : Rs 10 lakh seized धरणगाव (11 ऑगस्ट 2025) : धरणगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून सुमारे दहा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला मात्र वाहन चालक पसार होण्यात यशस्वी झाला.
गस्तीदरम्यान कारवाई
शनिवार, 9 ऑगस्ट रोजी धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार हवालदार सुधीर आनंदा चौधरी, हवालदार सत्यवान बाबुराव पवार, कॉन्स्टेबल किशोर देविदास भोई, होमगार्ड निखिल चौधरी आदी धरणगाव शहरातील अमळनेर चौफुली परिसरात गस्त घालत असताना शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्याने एक मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (एम.एच.01 डीपी 0252) जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा ेला मात्र चालकाने सुसाट वेगाने वाहन पळवल्यानंतर पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर संशयीताने कार पारोळा रस्त्यावरील एका झाडाजवळ लावत पळ काढला. अज्ञात कार चालकाविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





यांनी केली कारवाई
धरणगावचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनपाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार सुधीर आनंदा चौधरी, हवालदार सत्यवान पवार, हवालदार राजू पितांबर पाटील, कॉन्स्टेबल किशोर देविदास भोई, चंदन विष्णू पाटील, सुमित बाविस्कर, संदीप पाटील आदींनी ही कारवाई केली. तपास फौजदार संतोष काशिनाथ पवार करत आहेत.
