रेल्वेतून पडल्याने जळगावच्या महिलेचा मृत्यू : अपघाताला रेल्वे बोर्ड कारणीभूत ! दिली इतक्या लाखांची भरपाई ; काय आहे नेमकी बातमी


जळगाव (12 ऑगस्ट 2025) : रेल्वे गाड्यांना बारमाही गर्दी असते मात्र किफायतशीर दरातील प्रवासामुळे प्रवासी रेल्वेला अधिक पसंती देतात. जनरल बोगीत पाय ठेवायला जागा नसलीतरी जीव धोक्यात घालून प्रवास केला जातो मात्र असाच प्रवास करताना जळगावातील महिला डब्यातून खाली पडून मृत झाली. या संदर्भातील दावा दाखल झाल्यानंतर नागपूर रेल्वे क्लेम ट्रीब्युनल  कोर्टाने रेल्वे बोर्डाला दोषी ठरत मृत महिलेच्या पतीला 11.60 लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

काय आहे नेमके प्रकरण ?
जळगाव शहरातील तांबापूा भागातील रहिवासी शहनियाज अली शाह अमीर शाह यांची पत्नी 23 एप्रिल 2019 रोजी जळगावहून मनमाडकडे गोवा एक्स्प्रेसने निघाल्या होत्या. रेल्वे डब्यातील प्रचंड गर्दीमुळे रेटारेटी झाली व गर्दीतून पडल्याने महिलेचा मृत्यू ओढवला.






नागपूर रेल्वे क्लेम ट्यूबनेल कोर्टाकडे या प्रकरणी दाद मागण्यात आल्यानंतर जळगावच्या महिलेच्या मृत्यूला रेल्वे बोर्ड कारणीभूत असून संबंधित महिलेल्या पतीला 11.60 नखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश नागपूर येथील रेल्वे क्लेम व्युनल कोर्टाने नुकतेच दिले

जनरल कोचमध्ये प्रवासी संख्येपेक्षा जास्त तिकीट विक्री करण्यात आल्यानेच रेल्वे गर्दीत वाढली व त्यामुळे रेटारेटी होवून महिला खाली पडल्याचा निष्कर्ष काढत रेल्वे बोर्डाला दोषी धरण्यात आले.

संबंधित महिलेच्या पतीला नुकसान भरपाई म्हणून आठ लाख रुपये त्यावर व्याजापोटी तीन लाख 60 हजार रुपये मिळून 11 लाख 60 हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

याप्रकरणी जीआरपी पोलिस अनिल नगराळे यांनी घटनेचा तपास केला. तपासाअंती रेल्वेच्या डब्यात गर्दी असल्याने महिलेचा तोल गेल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !