29 हजारांची लाच घेताना पाचोर्यातील वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Assistant engineer of power company in Pachorya caught by ACB while accepting bribe of Rs 29,000 भुसावळ (12 ऑगस्ट 2025) : सोलर प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी 29 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना पाचोरा महावितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (38, रा.अभियंता नगर, संभाजी चौकाजवळ, पाचोरा) यास जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने लाचखोर हादरले आहेत.





असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण तीन प्रकरणे तयार करून ऑनलाईन सबमीट केली. या तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी तीन हजारांप्रमाणे नऊ हजार व यापूर्वी एकूण 28 प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिल्याने 30 हजार रुपये दिल्यानंतर उर्वरीत 40 हजार रुपये होत असून पहिल्या हप्त्यात 20 हजार व आधीचे नऊ हजार रुपये मिळून 29 हजारांची लाच मागणी 11 व 12 मनोज मोरे यांनी केली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच मनोज मोरे यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस उपउपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.
