बेटावद खुर्दच्या तरुणाची हत्या : आरोपींवर मकोका अंतर्गत व्हावी कारवाई
यावल (13 ऑगस्ट 2025) : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावातील सुलेमान रहिम खान पठाण (21) या तरुणाची अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. या घटनेतील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग आणि संबंधित अधिकार्यांना मंगळवार, 12 रोजी निवेदन देण्यात आले.
या मागण्यांचा निवेदनात समावेश
घटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी एस.आय.टी.मार्फत करण्यात यावी, दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार 90 दिवसांत चार्जशीट दाखल करावी, पीडितेच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबीयास सरकारी नोकरी द्यावी, मानवाधिकार आयोग व अल्पसंख्याक आयोग यांनी स्वतः लक्ष घालावे, गावात पोलिस बंदोबस्त वाढवावा आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, एकता संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला इशारा दिला की, दोषींवर कारवाई न झाल्यास आणि पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.





मागण्यांचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना अशोक लाडवंजारी तर अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना मतीन पटेल यांच्याहस्ते देण्यात आले. अल्पसंख्यांक आयोग व मानव अधिकार आयोग व मंत्री गिरीश महाजन यांना प्रशासनामार्फत व डायरेक्ट निवेदन पाठवण्यात आलेले आहे
यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा एकता संघटनतर्फे अशोक लाडवंजारी, फारुक शेख, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, मतीन पटेल,मौलाना गुफरान, हाफिज इमरान काकर, जामनेरचे जावेद मुल्लाजी व आसीफ इस्माईल, रज्जाक पटेल, कासिम उमर, नजमोद्दीनं शेख, आरीफ देशमुख, युसूफ खान व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
