भुसावळातून चोरट्यांनी बुलेट लांबवली
भुसावळ (19 ऑग्स्ट 2025) : शहरातील पांडुरंगनाथ नगर परिसरातून काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांनी वाहनधारक हतबल
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान, सुनील पांडुरंग इंगळे (रा. पांडुरंगनाथ नगर, पुजा कॉम्प्लेक्स जवळ, भुसावळ) यांची 45 हजार रूपये किंमतीची बुलेट मोटारसायकल (एम.एच.19 ई.डी.7650) ही अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेली. सुनील इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करत आहे.