p>

भुसावळात उद्योगधंद्यांअभावी बेरोजगारी वाढली


आमदार संजय सावकारे ; एमआयडीसी मोठे प्रकल्प येण्याची अपेक्षा

भुसावळ : भुसावळ शहरात एमआयडीसी असलीतरी मोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी वाढून युवक वाममार्गाला लागत असल्याची खंत व्यक्त आमदार संजय सावकारे यांनी महाजनादेश यात्रेनिमित्त शुक्रवारी आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.आमदार संजय सावकारे यांनी रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांना पाच हजार घरे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत वरणगाव-तळवेल उपसा-सिंचन योजनेसाठी 350 कोटी दिल्याने सरकारचे आभार मानत बंदिस्त पाईप लाईनसाठी निधीची मागणी केली. अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने व योजनेतील अटीमुळे डांबरीकरण करता येत नसल्याने जनतेचा लोकप्रतिनिधींविषयी रोष वाढत असून विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी केली तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा तसेच तालुक्यातील भिलमळी-मांडवेदिगर येथील नागरीकांचा प्रश्‍न सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली. शहरातील वीज मीटरबाबत सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनामुळे या प्रश्‍नाबाबतही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे ते म्हणाले.


कॉपी करू नका.