छत्तीसगडमधील घरून पळालेला अल्पवयीन आरपीएफच्या ताब्यात


Minor who ran away from home in Chhattisgarh taken into custody by RPF भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ‘ऑपरेशन नन्हें फरिश्ते’ मोहिमेंतर्गत घरातून नाराज होऊन पळालेल्या 15 वर्षीय मुलाला आरपीएफच्या तत्परतेने शोधून सुरक्षितपणे बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी रेल्वे स्थानकावर घडली.

काय आहे नेमके प्रकरण
13 ऑगस्ट रोजी एक अल्पवयीन मुलगा भुसावळ रेल्वे स्थानकाच्या पाचव्या-सहाव्या प्लॅटफॉर्मवर असल्याचे आरपीएफ पथकाला दिसून आले.माहिती मिळताच ड्युटीवरील आरपीएफ आरक्षक अनुज कुमार यांनी शोध घेत मुलाला आरपीएफ ठाण्यात आणून अधिकारी सुदामा यादव यांच्यासमोर चौकशी केली. त्यावेळी त्या मुलाने आपले नाव अमन अजय लहरे (15, रा.खैना, जाजगीर-चौवा, छत्तीसगड) असल्याचे सांगितले. तो घरच्यांवर नाराज होऊन घरी कुणालाही न सांगता घरून निघून गेला, असे त्याने कबूल केले.

आरपीएफने तत्काळ ही माहिती आधार बहुउद्देशीय संस्थेच्या भुसावळ येथील कर्मचार्‍यांना दिली. आवश्यक कागदपत्री प्रक्रिया पूर्ण करून मुलाचे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली. यावेळी जळगाव येथील बालकल्याण समितीकडे त्याला दाखल केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !