भुसावळातील अप्सरा चौकात हातगाड्या लावू नये : पालिकेच्या सूचना

व्यावसायीकांना दिलेली जागा व्यवस्थित करून द्यावी ; हॉकर्स


Handcarts should not be parked at Apsara Chowk in Bhusawal : Municipal Corporation instructions भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : शहराच्या मध्यवर्ती अप्सरा चौकात हातगाड्या लावून व्यवसाय करणार्‍या हॉकर्सना पालिकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यापुढे चौकात हातगाड्या उभ्या करू नयेत, अशी थेट सूचना पालिकेच्या माध्यमातून व्यावसायिकांना दिली आहे. आठवडाभरात या गाड्या नवीन जागेत लावाव्यात,अशी सूचना पालिकेने दिली आहे, मात्र, आम्हाला जागा व्यवस्थित करून देत नाही, तोपर्यत जुन्या जागेवर गाड्या लावू द्याव्यात अशी मागणी व्यावसायीकांनी केली आहे.

हॉकर्सला मिळाली जागा
पालिकेने हॉकर्सना आठवडे बाजारात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असून, पुढील आठवडाभरात व्यवसाय नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दिलेली जागा अद्याप सपाटीकरण न झाल्याचा आरोप हॉकर्सनी केला आहे. जागेवर आखणीचे काम सुरू असून, ते काम एका दिवसात पूर्ण झाल्यावर व्यापार्‍यांना ती वापरता येणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली. मुख्य रस्त्यावर हातगाड्या उभ्या राहिल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेचे म्हटले आहे.






हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष राजू सपकाळे म्हणाले,पालिकेने दिलेली जागा सपाट आणि व्यवसायासाठी योग्य करून दिल्याशिवाय आम्ही जुन्या ठिकाणावरून हलणार नाही. जागा व्यवस्थित झाल्यावरच दुकाने थाटली जातील.

लकी ड्रॉद्वारे जागांचे वाटप
मंगळवारी लकी ड्रॉद्वारे जागांचे वाटप झाले असून, पालिकेने आठवडाभरात नवीन जागेत स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या मात्र सुस्थितीत जागा झाल्यावरच दुकाने तेथे हलविली जातील, असे सपकाळे यांनी सांगितले.

पालिकेतर्फे अनाऊन्सद्वारे सूचना
बुधवारी सकाळी 10 वाजताच पालिकेच्या गाडीच्या माध्यमातून अप्सरा चौक, डिस्को टॉवर परिसर या भागात उभ्या केलेल्या हातगाड्या काढण्याच्या सूचना केल्यात मात्र व्यावसायीकांनी विनंती करीत नवीन जागेवर जोपर्यंत जात नाही, तोपर्यत येथेच पोट भरू द्यावे, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !