भुसावळात पालिका निवडणूक : सोमवारी प्रारुप प्रभाग रचना होणार जाहीर !

21 ऑगस्टपर्यंत घेता येणार हरकती : 30 सप्टेंबर अंतीम प्रभाग रचना होणार जाहीर


Municipal elections in Bhusawal : Draft ward structure to be announced on Monday! भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना तयार होणार आहे. सोमवार, 18 ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहिर होऊन यावर 21 ऑगस्टपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत. हरकतींवर सुनावणी होऊन 26 ते 30 सप्टेंबरपर्यंत अंतीम प्रभाग रचना जाहिर होईल.

21 ऑगस्टपर्यंत मागवता येणार हरकती
पालिकेत मुख्याधिकारी 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करणे व हरकती मागवल्या जातील. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकार्‍यांकडे हरकतींवर सुनावणी होईल. 2 ते 8 सप्टेंबर दरम्यान प्रभग रचना नगर विकास विभागाकडे सादर होऊन 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अंतीम प्रभाग रचना सादर होईल. या प्रक्रियेची राजकिय क्षेत्राला उत्सुकता लागून आहे. दरम्यान, सुरवातीला कोरोना महामारी व नंतर मराठा आरक्षणाच्या मुद्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिकेची सार्वत्रिक निवडणूक रखडली.






सलग साडेतीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकिय राजवट कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले होते. यानुसारच आगामी निवडणूक होणार आहे. पालिकेत पूर्वीप्रमाणे 13 जागा ओबीसीसाठी राखीव ठेवून आगामी काळातील निवडणूका होतील. यातील 50 टक्के अर्थात 7 जागांवर ओबीसी महिलांना आरक्षण राहिल.

आठ हजार लोकसंख्येमागे एक सदस्य वाढणार
‘अ’ वर्ग नगरपालिकेसाठी 1 लाख लोकसंख्येसाठी 40 तर त्यावरील प्रत्येक आठ हजार लोकसंख्येमागे एक सदस्य वाढेल. अर्थात सन 2011 च्या जगणनेनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या एक लाख 87 हजार 421 असल्याने पालिकेच्या आगामी निवडणूकीत एक प्रभाग वाढून सदस्यांची संख्या दोनने वाढणार आहे. यापूर्वी 24 प्रभाग आता 25 होतील तर 48 ऐवजी 50 सदस्य निवडून येतील.

महिलांसाठी 50 टक्के आरक्षण
आगामी निवडणुकीत 25 प्रभाग व 50 जागा असतील. 50 टक्के महिला आरक्षणानुसार 25 जागांवर महिला आरक्षण असेल. भुसावळ शहरात अनुसूचित जातींची लोकसंख्या 28 हजार 542 इतकी आहे. तर एसटी अर्थात अनुसुचित जमातीची लोकसंख्या 6 हजार 125 आहे. यानुसार अनुसूचित जातीसाठी आठ जागा, एसटी अर्थात अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षीत राहतील. ओबीसीसाठी 13 जागांवर आरक्षण असेल.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !