भुसावळ नगरपालिकेतर्फे नागरिकांना ध्वज वाटप


भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : प्रधानमंत्री द्वारा स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भुसावळ नगरपालिकेतर्फे 14 ऑगस्ट सकाळपासून अग्निशामन केंद्र हॉटेल, रंगोली खाली, जामनेर रोड या मुख्य रस्त्यावर अल्प दरात झेंडे विक्री करण्यात आले.

सर्वप्रथम पर्यावरणमित्र डॉ.सुरेंद्रसिंग पाटील यांनी कर्मचारी विकास महाजन यांच्याकडून झेंडा विकत घेतला. विजय चौधरी टहाकळीकर यांनी कर्मचारी प्रशांत इंगळे यांच्याकडून बेंडाळे यांनी कर्मचारी चंद्रशेखर येवले, राज गिरी यांच्याकडून झेंडा विकत घेतला.






नगरपालिकेने कर्मचारीमार्फत नागरिकांना हर घर तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी स्वस्त दरात झेंडे उपलब्ध करून दिले. त्याबद्दल नगरपालिकेचे पर्यावरण मित्र डॉ.सुरेंद्रसिंग पाटील यांनी आभार मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !