एमआयडीसीकडून जमीन घेऊन काम न करणार्यांना नोटीस देऊन जमीन ताब्यात घेणार : जळगावात अजित पवार
Will give notice to those who do not work by taking land from MIDC and will take possession of the land : Ajit Pawar in Jalgaon जळगाव (17 ऑगस्ट 2025) : एमआयडीसीकडून जमीन घेऊन काम न करणार्यांकडील जमीन नोटीस देवून ताब्यात घेणार असल्याचे मोठे विधान जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्ष प्रवेश मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सर्व जाती-धर्माला सोबत घेत काम
अजित पवार म्हणाले, 18 पगड जातींना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केले. त्यानुसार 26 वर्षांपूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत काम सुरू आहे. जाती-धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी प्रतिभा शिंदे या 25 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. पण सत्ता आल्यानंतर आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. कारण निर्णय आणि धोरण घेण्याची क्षमता असते. आम्ही कधी भेदभाव करत नाही, समविचाराने काम करतो.





