जळगाव हादरले : चाकूचे वार करीत तरुणाची निर्घृण हत्या
Jalgaon shaken: Brutal murder of a young man with a knife जळगाव (18 ऑगस्ट 2025) : वाढत्या गुन्हेगारीने डोके वर काढल्याने शहरात पुन्हा एका तरुणाचा बळी गेला आहे. चाकूचे वार करीत पहाटेच्या सुमारास 26 वर्षीय तरुणाची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत हत्या करण्यात आली आहे. विशाल ऊर्फ विकी रमेश मोची असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर पाच ते सहा हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
काय घडले जळगावात
सोमवार, 18 पहाटे तीन वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ विशालवर अचानक 6 ते 7 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.





घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. विशाल मोची हा रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असून सोलर पॅनेलच्या बेस बसवण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. तरुणाच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. दरम्यान, हत्येचे कारण समोर आले नसलेतरी वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.
