पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आज व उद्या “धो धो पाऊस’
“Heavy rain” expected in Konkan including western Maharashtra today and tomorrow मुंबई (18 ऑगस्ट 2025) : कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) सोमवार, 18 ते मंगळवार, 19 ऑगस्ट दरम्यान धो धो पाऊस बरसणार आहे. मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याच्या प्रभावामुळे हा पाऊस बरसणार असल्याचे आयएमडीने कळवले आहे.
कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे जोरदार पाऊस होईल. खान्देश व मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.





