दहशत निर्माण करणार्यांची पोलिसांनी काढली धिंड
Police crack down on terror-mongers नाशिक (18 ऑगस्ट 2025) : दहशत निर्माण करणार्यांचा पोलिसांनी माज उतरवत त्यांची धिंडच काढली. अंबड पोलिसांच्या या उपक्रमाने सर्वसामान्य सुखावले आहेत.
सिडकोतील एका दुकानात दहशत निर्माण करणार्या आणि मद्यधुंद अवस्थेत व्यावसायिकाला मारहाण करणार्या संशयिताना धडा शिकवण्यासाठी ज्या ठिकाणी दहशत माजवली त्याच ठिकाणी अंबड पोलिसांनी त्यांची धिंड काढत झिंग उतरवली.





छत्रपती शिवाजी चौकात रात्रीच्या सुमारास टोळक्याने व्यावसायिकाला स्टील रोडने मारहाण करित धुडगूस घातल्याची घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान करत दहशत माजवली होती.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तपासाची चक्र फिरवत अर्धा तासाच्या आत संशयित स्वप्नील सुभाष कावले, गुड्डू उर्फ प्रेम एकनाथ सावंत, राहुल विठ्ठल पांलटे, सनी राजू आठवले (सर्व राहणार इंदिरा गांधी वसाहत) व सुफियान सलीम शेख (रा. लेखानगर या पाचही संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात संशयितांची धिंड काढली.
