आठशे रुपयांची लाच भोवली : नवापूर भूमी अभिलेखचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
ACB catches Navapur land records constable in bribery case नंदुरबार (19 ऑगस्ट 2025) : वनक्षेत्रातील जमिनीच्या चतु:सीमा, एकत्रीकरण व आकारबंदअशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात आठशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर पुरते हादरले आहेत.





असे आहे लाच प्रकरण
कुकराण, ता.नवापूर येथील 44 वर्षीय तक्रारदाराने 13 ऑगस्ट 2025 रोजी लेखी तक्रार दिली की, त्याांची शेतजमीन कुकराण, ता.नवापूर गावाचे वनक्षेत्रात आहे. या जमिनीचे हक्कासंबंधीचे चतु:सीमा, एकत्रीकरण व आकारबंद अशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक हजारांची लाच मागण्यात आली व एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला व आठशे रुपयांची लाच घेताच आरोपी शिपायाला अटक करण्यात आली. नवापूर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते, एएसआय विलास पाटील, विजय ठाकरे, हेमंतकुमार महाले, जितेंद्र महाले, सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.
