शालेय हॉलीबॉल स्पर्धेत भुसावळातील बियाणी स्कूलचे वर्चस्व
विद्यार्थ्यांनी खेळ विद्या म्हणून खेळावा : संजयसिंग चव्हाण
भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शालेय शासकीय हॉलीबॉल स्पर्धा झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन साईमतचे पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी होत्या. शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे बी.एन. पाटील यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू प्रशिक्षक पंच उपस्थित होते.





खेळातून उंचवावे रनाव : संजयसिंग चव्हाण
सर्वप्रथम मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संजयसिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळ हा खेळ भावनेने खेळा परंतु खेळ विद्या म्हणूनच खेळला पाहिजे ज्याप्रमाणे आपण अभ्यास विद्या म्हणून करतो विद्याही केव्हाही आपल्याला ग्रहण करता येते. हरलेल्या संघांनी पराभवाला खचून न जाता पुन्हा सराव करून यश संपादन करावे. जिंकलेल्या संघांनी आपल्या तालुका जिल्हा राज्याचे नाव उंचावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करावे. डॉ.संगीता बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल असा
14 वर्षाखालील मुले प्रथम- बियाणी पब्लिक स्कूल, द्वितीय- ताप्ती पब्लिक स्कूल, तृतीय- बियाणी मिलिटरी स्कूल
14 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम- अहिल्यादेवी कन्या विद्यालय, द्वितीय- बियाणी पब्लिक स्कूल, मिरगव्हाण यांनी मिळवला.
17 वर्षातील मुलांमध्ये प्रथम- बियाणी मिलिटरी स्कूल तर द्वितीय- पंडित नेहरू विद्यालय, वराडसीम, तृतीय- ताप्ती पब्लिक स्कूल
17 वर्ष वयोगट- मुलींमध्ये प्रथम क्रमांक अहिल्यादेवी कन्या विद्यालय, द्वितीय- बियाणी पब्लिक स्कूल, मिरगव्हाण यांनी तर तृतीय- बियाणी मिलिटरी स्कूल
19 वर्षातील मुला-मुलींमध्ये प्रथम- बियाणी इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज
सर्व विजयी संघ जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सर्व विजयी संघांना शुभेच्छा देण्यात आल्या. पंच म्हणून हिंमत पाटील, तोसीब कुरेशी, विजय संकेत, वंदना ठोके, दत्तू अहिरे, बी.एन.पाटील, निलेश राजपूत, अजय डोळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व बियाणी मिलिटरी स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
