एरंडोल तालुका हादरला : वीज प्रवाहाच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा करुण अंत


Erandol taluka shaken: Five members of the same family tragically died due to electric shock एरंडोल (20 ऑगस्ट 2025) :वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू ओढवला. मन विषन्न करणारी ही धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील गट क्रमांक 21 मधील शेतात बुधवार, 20 रोजी दुपारी समोर आली. या घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यांचा ओढवला मृत्यू
या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा (30), सुमन विकास पावरा (25), पवन विकास पावरा (04), कवल विकास पावरा (03) व लिलाबाई जामसिंग पावरा (60) यांचा मृत्यू झाला तर दुर्गा विकास पावरा (वय 2) ही झोक्यात झोपलेली मुलगी सुखरूप बचावली आहे.






अशी घडली घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंडू युवराज पाटील व अलकाबाई बंडू पाटील यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण लावण्यात आले होते. या कुंपणालत वीज प्रवाह सोडण्यात आलेला होता. मध्यप्रदेशातील आदिवासी पावरा कुटूंबियांचा या तारेला स्पर्श झाल्यामुळे ही घटना घडली.

पोलिस प्रशासनाची धाव
या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व सहकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतक हे मध्यप्रदेशातील जि. बुरहानपूर, ता. खकणा येथील पो. ओसरणी गावचे रहिवासी आहेत.

प्रशासनाकडून या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !