पाचोरा तालुका हादरला : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवले


Pachora taluka shaken : Wife killed over suspicion of character पाचोरा (20 ऑगस्ट2025) : चारित्र्याच्या संशयाने मनात घर केल्याने संतप्त पतीने पत्नीची धारदार शस्त्र मारून हत्या केली. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे ही घटना मंगळवारी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास घडली. अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (32) असे खून झालेल्या पत्नीचे तर नितीन दौलत शिंदे (वय 35, रा.पाचोरा रोड, लोहारा) असे अटकेतील आरोपी पतीचे नव आहे.

गाढ झोपेत केली हत्या
मयत अर्चनाचा भाऊ आकाश कडूबा सपकाळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे आणि त्याच्या कुटुंबीयांकडून अर्चनाचा अनेक दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. नितीन तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता तसेच घर बांधण्यासाठी तिच्या माहेरच्या लोकांकडून 10 लाख रुपये आणण्यासाठीही तिचा छळ केला जात होता. मंगळवारी मध्यरात्री अर्चना गाढ झोपेत असताना, नितीनने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिची हत्या केली.






पोलिस अधिकार्‍यांची धाव
पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, एपीआय कल्याणी वर्मा यांच्यासह यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी नितीन शिंदेला ताब्यात घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !